सांगली : मनोहर सन्मुख (कासेगाव), विकास पवार (कुंडल) यांची राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कामगार संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या बैठकीत या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघाचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण कार्याध्यक्ष तानाजीराव खराडे प्रमुख उपस्थित होते.
निवडीनंतर राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील व उपाध्यक्ष विजयराव पाटील यांच्या हस्ते कामगार संचालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यकारी संचालक माहुली यांनी कामगार संघटनेच्या पत्राचे वाचन केले. संचालक प्रदीपकुमार पाटील, प्रतापराव पाटील, दादासाहेब मोरे, शैलेश पाटील, रामराव पाटील, दीपक पाटील, अतुल पाटील, हणमंत माळी, राजकुमार कांबळे, दिलीपराव देसाई, वैभव वसंतराव रकटे, संचालिका मेघा पाटील, प्रा. डॉ. योजना शिंदे- पाटील, कारखान्याचे सचिव डी. एम. पाटील, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील उपस्थित होते.