लखनौ : केंद्र सरकारने साखर हंगाम २०२२-२३ साठी ऊसाच्या योग्य आणि लाभदायी दरात (FRP) १५ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे ऊसाची एफआरपी ३०५ रुपये प्रती क्विंटल झाली आहे. त्यानुसार आता उत्तर प्रदेशात आगामी ऊस गळीत हंगामात SAP जैसे थे राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दि टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या वर्षी SAP मध्ये वाढ होण्याची कमी शक्यता आहे. कारण गेल्या वर्षी, २०२२ मध्ये उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सप्टेंबर महिन्यात यामध्ये २५ रुपयांची वाढ करून हा दर ३४० रुपये प्रती क्विंटल (नियमित वाणासाठी) करण्यात आला आहे.
प्रसार माध्यमातील वृत्तामध्ये म्हटले आहे की, सूत्रांनी सांगितले की, एसएपीमध्ये वाढ केल्यास कारखान्यावर बोजा पडू शकतो. त्यांची ऊस बिले देण्याची क्षमता घटू शकते आणि ऊसाच्या थकबाकीत वाढ होऊ शकेल. विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एसएपी वाढवणे अथवा घटवणे हा खूप मोठ्या प्रमाणात राजकीय निर्णय आहे. मात्र, कोणतीही वाढ राज्यातील साखर उद्योगासाठी हानीकारक असेल.