सातारा : गोळेश्वर येथे आगीत ८० एकरातील ऊस जळून खाक

सातारा : कराड तालुक्यातील गोळेश्वर येथील कैकाडा शिवाराला लागलेल्या आगीत सुमारे ८० एकर ऊस जळून खाक झाला. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुमारे ७० शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शेजारील शेतकऱ्यांनी ऊसाचा खोडवा पेटवल्याने त्याच्या झळा पसरून आग लागल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गोळेश्वर गावचे तलाठी सुजित थोरात यांनी घटनास्थळी जळालेल्या उसाच्या क्षेत्राची पाहणी व पंचनामा केला.

गोळेश्वर परिसरातील कैकाडा शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या तोडणी सुरू आहे. त्यातील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पाचट पेटवले. ही आग वाऱ्यामुळे इतरत्र पसरली. आग शेजारील ऊसाला लागली. धुरांचे लोट पसरल्यानंतर शेतकऱ्यांनी तेथे धाव घेतली. पोलिस प्रशासन, अग्निशामक दलानेही घटनाची माहिती मिळताच तेथे दाखल होत मदतकार्य सुरू केले. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी तत्काळ दाखल होत घटनेची जळालेल्या ऊस क्षेत्राची पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here