सातारा : सह्याद्री कारखान्यासाठी आतापर्यंत ९४ अर्ज दाखल, विरोधी गटाकडून जोरदार आरोप

सातारा : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी ९१ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आजपर्यंत ९४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. घोरपडे गटाच्या उमेदवारांनी मंगळवारी आ. मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विद्यमान अध्यक्षांवर टीकेची झोड उठवली. आमदार घोरपडे म्हणाले की, इतर साखर कारखान्यांचे विस्तारीकरण साधारणतः अडीचशे कोटींमध्ये आणि तेही एका वर्षांत झाले. मात्र, तीन वर्षांनंतरही ‘सह्याद्रि’चे विस्तारीकरण पूर्ण झालेले नाही. कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी ४१८ कोटी रुपयांचा प्राथमिक खर्च दिसत असला, तरी तो ५५० ते ६०० कोटींपर्यंत गेला आहे. विद्यमान अध्यक्षांनी सह्याद्री कारखान्याला कर्जाच्या गर्तेत लोटले आहे.

घोरपडे यांनी सांगितले की, कारखान्याची निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रयत संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजपने घेतला आहे. विद्यमान अध्यक्षांना घरी बसवण्याचे सर्वांचे प्रयत्न आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारे सभासद अधिक असल्याने, या निवडणुकीत त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांची भेट घेतली. कारखान्यात चुकीच्या पद्धतीने कामकाज सुरू आहे. कारखाना सभासदांचा राहिला नसून तो पिता पुत्राच्या मालकीचा झाला आहे. त्याला आमचा विरोध आहे. त्यासाठी एकत्र निवडणूक लढवली जात आहे, असे ते म्हणाले.

 

महत्त्वाच्या बातम्या:
सातारा : नवी दिल्लीत ‘जयवंत शुगर्स’चा राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्काराने गौरव

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here