सतारा : श्रीराम सहकारी साखर कारखान्याकडून ३१०० प्रमाणे रक्कम जमा

सतारा : श्रीराम सहकारी साखर कारखाना लिमिटेड (फलटण) येथे १६ ते ३१ डिसेंबर २०२४ अखेर गाळपास आलेल्या ७६ हजार ८१६ मेट्रिक टन उसाचे प्रतिटन ३१०० रुपयेप्रमाणे विनाकपात एकरकमी एफआरपीनुसार २३ कोटी ८१ लाख २९ हजार ६०० रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३० डिसेंबरला वर्ग करण्यात आले आहेत.

श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा २०२४- २५ गळीत हंगाम १५ नोव्हेंबरला सुरू झाला. ता. २९ जानेवारीअखेर ७६ दिवसांत तीन लाख ४२ हजार ६५७ मेट्रिक टन ऊस गाळप झाले असून, तीन लाख ९० हजार ८०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ११.४८ टक्के पडला आहे. या वर्षीच्या गाळप हंगामामध्ये ता. ३१ डिसेंबरअखेर एकूण ऊस गाळप दोन लाख १० हजार ४५९ मेट्रिक टन इतके झाले असून, विनाकपात एक रकमी दर ३१०० रुपये प्रती मेट्रिक टनाप्रमाणे एकूण ६५ कोटी २४ लाख २२ हजार ९०० रुपये संपूर्ण ऊस पेमेंट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here