सातारा : शेवाळेवाडी (म्हासोली, ता. कराड) येथील अथणी शुगर, रयत कारखाना कारखाना कार्यस्थळावर ऊस तोडणी मजुरांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. या शिबिरात २६३ मजुरांचे आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन युनिट प्रमुख रवींद्र देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र माळी यांची उपस्थिती होते. यावेळी मुख्य शेती अधिकारी विनोद पाटील, डॉ. चंद्रकांत सातपुते, डॉ. स्नेहल मोरे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सुहास यादव उपजिल्हा रुग्णालय कराडचे डॉ. प्रशांत माने यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी शेती अधिकारी विनोद पाटील म्हणाले, येवती प्राथमिक आरोग्य केंद्र व अथणी शुगर, रयत कारखानाच्या संयुक्त विद्यमाने कारखान्याच्या कार्यस्थळावर ऊस तोडणी मजुरांसाठी तातडीच्या सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे. ऊसतोड याबरोबरच मजुरांच्या आरोग्याची काळजी घ्यायची कारखान्याच्यावतीने मजुरांसाठी आरोग्य आयोजन केले आहे.