सातारा : य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कृष्णा विश्व विद्यापीठ (कराड) यांच्यामार्फत जागतिक दंतरोग दिनानिमित्त मोफत दंतरोग चिकिस्ता शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये १८७ कर्मचाऱ्यांची दंत चिकित्सा करण्यात आली. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांसाठी नियमितपणे आरोग्य शिबीरे आयोजित केली जातात.
कर्मचाऱ्यांच्या मौखिक आरोग्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या दंत चिकित्सा शिबिराचे उदघाटन कारखान्याचे संचालक शिवाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. वाढत्या वयानुसार शारीरिक समस्यांसोबत दातांच्या समस्येलाही सामोरे जावे लागते. दात पडणं, दात हलणं, कीड लागणं या समस्या प्रामुख्याने दिसतात. यासाठी आपण आपल्या दातांची काळजी योग्य पद्धतीने घेतली पाहिजे, असे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी प्रभारी कार्यकारी संचालक पंडित पाटील, सेक्रेटरी सिद्धेश्वर शिलवंत, जनरल मॅनेजर टेक्निकल बालाजी पबसेटवार, डॉ. गिरीश सुरगीमठ, जनरल मॅनेजर डिस्टीलरी विकास आभाळे, एच आर मॅनेजर संदिप भोसले, को जनरेशन मॅनेजर गिरीश इस्लामपूरकर, सिनियर सिव्हील इंजिनीयर जयवंत शिंदे, परचेस मॅनेजर विक्रमसिंह माने, सुरक्षा आणि पर्यावरण अधिकारी सुयोग खानविलकर, स्टोअर किपर गोविंद मोहिते, संरक्षण अधिकारी संजय नलवडे, अजित पाटील, वैद्यकीय अधिकारी हर्षल निकम यांची उपस्थिती होती.