सातारा : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण समाधिस्थळी अभिवादनासाठी जाताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात माहिती घेतली. यावेळी त्यांनी मानसिंगराव जगदाळे यांचा छाननीत अर्ज बाद कसा झाला, याचीही चौकशी केल्याचे समजते. सध्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यावर त्या अर्जाची छाननी झाली. त्यात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मानसिंगराव जगदाळे, निवास थोरात यांच्यासह अन्य काहींचे अर्ज बाद झाले. त्याची दखल पवार यांनी घेतल्याचे दिसते.
‘सह्याद्री’त लक्ष देणार नाही :अड. उदयसिंह पाटील
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा सभासद नसताना कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष देणे उचित नाही. कार्यकर्ते त्यांच्या पातळीवर निर्णय घेतील, असे सांगत रयत संघटनेचे नेते अड. उदयसिंह पाटील -उंडाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘सह्याद्री’च्या निवडणुकीत रयतचे कार्यकर्ते विद्यमान संचालक मंडळाच्या विरोधात काम करत आहे. याबाबतच्या भूमिकेसंदर्भातील प्रश्नावर अड. उंडाळकर म्हणाले, “प्रत्येक ठिकाणी नेत्याने आदेश द्यावा, अशी परिस्थिती नसते. हा त्या त्या ठिकाणच्या स्थानिक कार्यकर्ते, शेतकरी, सभासदांचा प्रश्न आहे.
सभासदांना अधिकार मिळवून देणार : खासदार उदयनराजे भोसले
यशवंतराव चव्हाण हयात असताना किवळकर, चोरेकर, पार्लेकर हे त्यांच्यासोबत होते. त्यांचे एकमत न झाल्यामुळे यशवंतराव चव्हाण यांनी सह्याद्री कारखाना पाहण्यासाठी पी. डी. पाटील यांचे नाव सुचवले. कारखान्याशी माझा काहीही संबंध नाही, माझा ऊस ही नाही. मात्र, सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, अशी यशवंतराव चव्हाण यांचीच शिकवण होती. मात्र गेल्या काही वर्षात सह्याद्री कारखान्यात दुसऱ्या कोणाला संधी मिळाली नाही. सभासदांना सर्वांना संधी मिळाली पाहिजे, त्यांचे अधिकार मिळवून देण्याचे काम लोकप्रतिनिधी म्हणून मला करावे लागेल, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या:
…असे करा उन्हाळ्यातील ऊस व्यवस्थापन, उत्पादनात होईल भरघोस वाढ
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.