सातारा : दत्त इंडिया साखर कारखान्याची फसवणूक, दोन कर्मचाऱ्यांसह दहा जणांना अटक

फलटण : श्री दत्त इंडिया साखर कारखान्याच्या दोन चिटबॉय व एका महिलेसह एकूण अकरा जणांनी एकाच वाहनाचे दोन वेळा वजन करून कारखान्याची ४ लाख २५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी सर्वांविरोधात गुन्हा दाखल करून दहा जणांना ताब्यात घेतले. कारखान्याचा शेतकरी कोड असणाऱ्या शेतकऱ्यांशी संगनमत करून ४ डिसेंबर ते १४ डिसेंबर यांदरम्यान ही फसवणूक झाली. एकदाच आणलेल्या उसाचे दोनवेळा वजन करून कारखान्याची १०२ टन ऊसबिल व तोडणी वाहतूक अशी एकूण ४ लाख २५ हजार रुपयांनी फसवणूक केल्याची फिर्याद कारखान्याचे केन मॅनेजर सदानंद पाटील यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्याचे चिटबॉय दत्तात्रय, ट्रॅक्टरवरील वाहक भिवा भुजबळ (रा. पिंपरे बु ता खंडाळा व सुनील संपत पवार, सचिन नबाजी कोकरे, राहुल म्हाळसाकांत कोकरे, चालक जितेंद्र चंद्रकांत भिसे, भाऊसो तात्याबा कोकरे, पांडुरंग विश्वनाथ सुतार, सुरज अशोक धायगुडे, ज्ञानेश्वर महादेव होळकर, सचिन महादेव होळकर आदींना अटक केली असून अनिता सचिन होळकर हिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांनी साखरवाडी येथील ऊस तोडून रात्रीच्या वेळी तीन ट्रॅक्टरमधून कारखान्यात आणला. उसाचे कारखान्याच्या वजनकाट्यावर वजन केले. मात्र, तो गव्हाणीमध्ये खाली न करता परत वजनाच्या रांगेमध्ये ट्रॅक्टर उभा केला. ट्रॅक्टरला असणारा कारखान्याचा कोड बदलून, त्यावरील चालक बदलून त्याच ट्रॅक्टरचे शेतकरी कोड असणाऱ्या कंत्राटदारांच्या नावावरती पुन्हा एकदा वजन करून तो उस गव्हाणीत खाली केला.

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here