सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ऊस दाराच्या प्रश्नाबाबत कोणताही तोडगा निघाला नाही. उसाला प्रतिटन ४००० रुपये दर जाहीर करावा, तोडणी वाहतूकदारांकडून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवावी, जिल्ह्यातील कारखानदारांनी तातडीने दर जाहीर करावा, या भूमिकेवर शेतकरी ठाम राहिले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखारांना ऊस दराबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची सूचना केली आहे. आता सोमवारी (दि. २३) पुन्हा याप्रश्नी बैठक होणार आहे.
सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवानात कारखानदार प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, सातारा जिल्हा शेतकरी संघटना, शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेचे वासीम इनामदार, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, रयत क्रांती संघटनेचे मधुकर जाधव, जिल्हा शेतकरी संघटनेचे कमलाकर भोसले, शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे गणपत यादव यांच्यासह कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कृष्णा आणि जयवंत शुगरने यापूर्वीच पहिली उचल ३२०० रुपये जाहीर केलेली आहे. त्यामुळे इतर कारखान्यांनीही त्याप्रमाणात दर जाहीर करायला हवा अशी मागणी संघटनांनी केली. तर साखर कारखानदारांनी एफआरपीप्रमाणे होईल तो दर दिला जाईल असे सांगितले.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.