सातारा : किसन वीर कारखान्याचे माजी चेअरमन, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त आज (दि. २५) दुपारी १ वाजता किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांचे मार्गदर्शन होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी दिली. त्याचबरोबर सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत किसन वीर कारखाना कार्यस्थळावर अभिवादन कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंत्री मकरंद पाटील असतील. खासदार नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी कारखान्याचे सभासद, हितचिंतक, कंत्राटदार, वाहनमालक आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी केले आहे.
प्रमोद शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे की, किसन वीर कारखाना, राष्ट्रवादी काँग्रेस, मिरज येथील सेवासदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सातारा येथील ऑन्को लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, वाई ग्रामीण रुग्णालय व भुईज प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कारखाना कार्यस्थळावर आयोजित मोफत महाआरोग्य शिबिरात मोतिबिंदू निदान, नेत्र तपासणी आणि अल्पदरात चष्मेवाटप, तपासणी, ईसीजी, हृदयविका मेंदूविकार, रक्तदाब, हिमोग्लोबिः मधुमेह, एचआयव्ही, संसर्गज आजार, क्षयरोग, विविध प्रकार कर्करोग, पॅरेलिसिस, डोकेदुर आणि विविध शस्त्रक्रियांबाब मार्गदर्शन करण्यात येणार आहे.