सातारा : पश्चिम महाराष्ट्रातील अन्य सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांच्या तुलनेत जरंडेश्वर शुगर मिल्सने नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये १८ लाख ७१ हजार ४२४ टन ऊस गाळप करून कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता आलेल्या ऊसाला उच्चांकी असा ३१०० रुपयांचा दर दिला आहे. यंदा दररोज १८ ते साडेअठरा हजार मेट्रिक टन ऊस गाळप केले जात आहे. कारखान्याकडे गळीतास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३२०० रुपये दर देणार आहे, अशी घोषणा कारखान्याचे संचालक सचिन सिनगारे यांनी दिली.
सिनगारे म्हणाले की, जरंडेश्वरच्या व्यवस्थापनाने कारखान्याची २५०० मेट्रिक टन गाळप क्षमता असताना अतिरिक्त ऊसाचे क्षेत्र व ऊस गाळपास घालवण्यासाठी उत्कृष्ट नियोजनाद्वारे कारखान्याचे विस्तारीकरण केले. कारखान्याने गेल्या पंधरा वर्षात सामान्यातील सामान्य शेतकऱ्याला आधार देण्याचे काम केले आहे. यंदाच्या गळीत हंगामाचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे केले आहे. कारखान्याचा वजन काटा अचूक असून सर्वांना वेळेवर पेमेंट केले जाते. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर श्रीधर गोसावी, मुख्य शेती अधिकारी चंद्रकांत थोपटे, वर्क्स मॅनेजर सुभाष थोरात, प्रोडक्शन मॅनेजर रमेश बावणे, डिस्टिलरी मॅनेजर बाळासाहेब शिंदे, चीफ अकौंटंट संभाजी येवले, लेबर ऑफिसर दिगंबर गिडे, कार्यालय अधीक्षक संदीप सावंत आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.