सातारा : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री व किसन वीरचे चेअरमन मकरंद पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची विस्कटलेली घडी बसविण्यात मागील तीन वर्षामध्ये यशस्वी झालेलो आहोत. गळित हंगाम २०२५-२६ मध्येही आपण सर्वांनी यापुर्वीपेक्षाही अधिक जोमाने साथ देऊन किसन वीरच्या उभारीत साथ देण्याचे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी केले. सातारा सहकारी शेती औद्योगिक तोडणी व वाहतुक सोसायटीमार्फत कारखाना कार्यस्थळावर प्राथमिक स्वरूपात अविनाश सावंत, आदिक ढाणे, पंडीत शिंदे, सुभाष खेडेकर, नितीन जायकर या ऊस तोडणी वाहतुक कंत्राटदारांनी करार केले. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमोद शिंदे म्हणाले की, ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना इतर कारखान्यांच्या प्रमाणे दर देण्याचा प्रयत्न केला, त्याचपद्धतीने आम्ही तोडणी वाहतुक कंत्राटदार, मशिन मालक बैलगाडी कंत्राटदार यांनाही दर देण्यात कमी पडलो नाही.
कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी तोडणी वाहतुक यंत्रणेने मागील सिझनप्रमाणे याही वर्षी कारखान्याला सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी कारखान्याचे संचालक हिंदराव तरडे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, खंडाळा कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, संचालक चंद्रकांत ढमाळ, बाळासो वीर, तोडणी वाहतुक संस्थेचे चेअरमन बबनराव साबळे, व्हाईस चेअरमन अजय कदम, मानसिंग साबळे, चंद्रकांत फडतरे, शशिकांत भोईटे, शामराव गायकवाड, बी. आर. सावंत, विश्वास डेरे, शेती अधिकारी शंकर कदम व विठ्ठल कदम, प्रदिप अहिरेकर, विक्रांत फडतरे, गणेश संकपाळ, गुरूप्रसाद हार्वेस्टर, सुरेश घाटे, किरण सावंत, गणेश पिसाळ, तेजस सावंत, संतोष ढाणे, किशोर जाधव, मोहन डेरे, समीर महांगडे, अमोल शिंदे, शंकर माने, भरत आसबे, संदिप शिंदे, प्रकाश शिंगटे, दत्तात्रय औटे, तोडणी वाहतुक कंत्राटदार, मशिन मालक, बैलगाडी कंत्राटदार बहुसंख्येने हजर होते.