सातारा : जरंडेश्वर शुगर मिल फसवणूकप्रकरणी एकास अटक; सहा जणांचा अद्याप शोध सुरू

सातारा : चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्वर शुगर मिलसोबत ऊस वाहतूक व तोडणीसाठी वाहने व मजूर पुरविण्याबाबतचा करार करून कराराप्रमाणे वाहने व मजूर न पुरवता १५ लाख ६६ हजार ८७रुपयांच्या फसवणूकप्रकरणी येथील पोलिसात दाखल गुन्ह्यातील एक संशयित हणमंत नामदेव आसबे (रा. शिराळा, ता. आष्टी, जि. बीड) याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. याबाबत संदीप मोहन सावंत (वय ३५, कार्यालयीन अधीक्षक, जरंडेश्वर शुगर मिल्स, चिमणगाव, मूळ रा. विसापूर, ता. खटाव) यांनी येथील पोलिस ठाण्यात १६ एप्रिल २०२५ रोजी फिर्याद दिली होती.

याप्रकरणी दिनकर नामदेव आजबे, नामदेव शामराव आजबे (दोघे रा. शिराळ, ता. आष्टी, जि. बीड), रविकांत झुंबर अडागळे, प्रकाश अंबादास लवांदे, विशाल अंकुश आजबे (तिघे रा. शिराळ, ता. आष्टी, जि. बीड) व बाबासाहेब राजाराम भंवर (रा. मुगाव, ता. आष्टी, जि. बीड) या सहा जणांचा शोध अद्याप सुरू आहे. दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांचे एक पथक नुकतेच बीड जिल्ह्यात नेले असताना त्यांना संशयित हणमंत आसबे याला अटक करण्यात यश मिळाले आहे. त्याला आज येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here