सातारा : कृष्णा सहकारी साखर कारखान्याने उत्पादित केलेल्या ९ लाख १ व्या साखर पोत्याचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन डॉ. सुरेश भोसले होते. यावेळी व्हा. चेअरमन जगदीश जगताप, लिंबाजी पाटील, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, संभाजीराव पाटील, शिवाजी पाटील, जे. डी. मोरे, विलास भंडारे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, दीपक पाटील, सी. एन. देशपांडे, कार्यकारी संचालक राम पाटील, वैभव जाखले, मनोज पाटील आदी उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. तानाजीराव चोरगे म्हणाले की, कृष्णा कारखाना शेतकरी हिताचे अनेक उपक्रम राबवत आहे. शेतकऱ्यांना चांगला दर देत आहे. म्हणूनच कारखान्याचा साखर कारखानदारीत एक अग्रगण्य कारखाना म्हणून लौकिक आहे. यावेळी चेअरमन डॉ. सुरेश भोसले म्हणाले की, कारखान्याने कमी कालावधीत चांगले गाळप केले आहे. कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान यामध्ये दिले आहे. सी. एन. देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. संचालक संजय पाटील यांनी आभार मानले.