सातारा : सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीची तयारी, प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

सातारा : यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीबाबत पुणे प्रादेशिक सहसंचालक आणि जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अधिसूचनेनुसार कारखान्याची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड उत्तर मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. निवडणुकीविषयी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात अद्याप शांतता आहे. येथे आ. डॉ. अतुल भोसले यांची भूमिका महत्त्वाची ठरेल. कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक पहिल्यांदाच जोरदार होण्याची चिन्हे आहेत.

आतापर्यंत जाहीर झालेल्या प्रक्रियेनुसार, कारखान्याच्या प्रारूप मतदारयादीवर हरकती व आक्षेप दाखल करण्यासाठी दि. २७ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यामध्ये दाखल हरकती व आक्षेपांवर ३ फेब्रुवारीपर्यंत निर्णय घेऊन, ७ फेब्रुवारी रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कराड उत्तर मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचा भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पराभव केला. त्यानंतर भाजपच्यावतीने सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आ. मनोज घोरपडे यांनी कारखान्याची निवडणूक लढवण्याबाबत भाष्य केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here