सातारा : देशातून २०२२-२३ या वर्षामध्ये जास्तीत जास्त साखर निर्यात केल्याबद्दल नवी दिल्लीच्या नॅशनल फेडरेशन को- ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज संस्थेकडून सह्याद्री सहकारी साखर कारखान्यास देशपातळीवरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली. कारखान्याला जास्तीत जास्त साखर निर्यातीचा देशपातळीवरील पुरस्कार यावर्षी चौथ्यांदा प्राप्त झाला आहे.
कार्यकारी संचालक पाटील म्हणाले की, कारखान्याने या चारही वर्षांत निर्यात केलेल्या मोठ्या प्रमाणातील साखरेस देशांतर्गत त्या-त्या वेळीच्या बाजारभावापेक्षा जास्त भाव मिळालेला आहे. नॅशनल फेडरेशन को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजच्यावतीने देशातील सर्व सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते. चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील यांचे उत्कृष्ट नियोजन व मार्गदर्शनामुळे आजवर कारखान्यास आजपर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचणे सुरू ठेवा.