सातारा : शेतकरी सभासदांच्या विश्वासावर काम करणारा सह्याद्री कारखाना असून, उस तोडीच्या बाबतीत विलंब होणार नाही व ऊस दराच्या बाबतीत सहयाद्री कारखाना कोठेही कमी पडणार नाही यासाठी शेतकरी सभासदांनी निश्चिंत राहावे, अशी ग्वाही मात्री मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. कोर्टी (ता. कराड) येथील सहयाद्री कारखान्याच्या नूतन गट ऑफीसच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील होते. राज्यात सत्ता नसली तरी आपण या प्रक्रियेपासून दूर गेलो आहे असे समजू नका. येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी सज्ज राहा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मात्री मंत्री पाटील म्हणाले, सहकारावार विश्वास ठेवून शेतकरी सभासदानी सहकार्य करावे. चांगला किफायतशीर दर देण्याची भूमिका सह्याद्री कारखान्याची आहे. तसेच सहकारामध्ये ताकद आहे ती शेतकरी सभासदामुळे. त्यामुळेच चांगले निर्णय घेवू शकतो. तुमची चांगली साथ व सहकार्य असणे आवश्यक आहे. शेतकरी सभासदांच्या विश्वासावर काम करणारा सह्याद्री कारखाना आहे. संचालक जशराज पाटील, माजी जि. प. सदस्य जयवंतराव जाधव, बाजार समितीचे संचालक सोमनाथ जाधव, उध्दवराव फाळके, पै. संजय थोरात, मानसिंगराव जगदाळे, दिनकरराव घोरपडे, तानाजीराव साळुंखे, अॅड. प्रमोद पुजारी, माणिकराव पाटील, सर्जेराव खंडाईत आदींची प्रमुख उपस्थिती होती. व्ही. बी. चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. पै. संजय थोरात यांनी आभार मानले.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.