सातारा : कराड येथील सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक बुधवारी जाहीर झाली. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमधून पहिल्याच दिवशी मसूर गटातून विद्यमान संचालक संतोष शिवाजीराव घार्गे यांनी आपला पहिला अर्ज दाखल केला. कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत २७ फेब्रुवारी ते ५ मार्च असून ५ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
कारखान्याच्या निवडणुकीसाठी दाखल अजांची छाननी ६ मार्च रोजी होणार असून वैध उमेदवारांची यादी ७ मार्च रोजी प्रसिद्ध होईल. त्यानंतर २१ मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर २४ मार्च रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप होईल. ५ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होईल. आणि ६ एप्रिल रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होईल. सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कन्हाड पालिकेच्या छत्रपती संभाजीराजे भाजी मार्केटमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय सुरू करण्यात आले असून, राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत.