सातारा: पडळच्या खटाव-माण तालुका ॲग्रो प्रो. लि. साखर कारखान्याने सन २०२३ २४ च्या गळीत हंगामामध्ये कारखान्याने ६ लाख १८ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले. कारखान्याने ११.६८ टक्के साखर उताऱ्यासह विक्रमी ६ लाख ७० हजार १४० क्विंटल साखर उत्पादन घेतले. यासाठी कारखान्याचे सर्व पदाधिकारी, अधिकारी व कामगारांचे सहकार्य लाभले. आता आगामी हंगामातही विक्रमी साखर उत्पादनाचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे को- चेअरमन मनोज घोरपडे यांनी केले. पडळ येथील कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रभाकर घार्गे, को- चेअरमन मनोज घोरपडे व कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी २०२४-२५ च्या गळीत हंगामाच्या तोडणी वाहतूक कराराचा शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते.
मनोज घोरपडे म्हणाले कि,शेतकरी आणि कर्मचाऱ्यांमुळे कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरु आहे. कारखान्याचे संचालक विक्रम घोरपडे, कृष्णात शेडगे, महेश घार्गे, प्रीती घार्गे- पाटील, टेक्निकल संचालक सनी क्षीरसागर, नरेंद्र साळुंखे, जनरल मॅनेजर काकासो महाडीक, शेती अधिकारी किरण पवार, चीफ इंजिनिअर सुभाष मोहिते, गोरख कदम, अजित मोरे, पुरवठा अधिकारी शिदोबा महाडिक, तोडणी वाहतूकदार उत्तम धनावडे, राजीव बरकडे, पांडुरंग खरात, रामचंद्र मेटकरी, राजाराम पडळकर, प्रकाश काळे, राजेंद्र शेंडगे उपस्थित होते.