सातारा – सह्याद्री साखर कारखान्यात सत्तांतर होणारच : आ. मनोज घोरपडे

सातारा : सहकारी साखर कारखान्यात सभासदांना कवडीमोल किंमत देणाऱ्या विद्यमान चेअरमन यांना आता सभासदच जागा दाखवून देतील. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांचा पट काढणारच, असे खुले आव्हान कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आ. मनोज घोरपडे यांनी माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना दिले आहे.

नागझरी (ता. कोरेगाव) येथे आयोजित कार्यक्रमात आ. घोरपडे बोलत होते. आमदार मनोज घोरपडे म्हणाले, सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात सत्ताधाऱ्यांनी चालविलेला मनमानी कारभार संपविण्यासाठी सभासदांनी आता जोरदार मोहीम सुरू केली आहे. ज्या पद्धतीने विधानसभेला जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती, तसेच कारखाना निवडणुकीमध्ये सुद्धा सभासद ही निवडणूक हातात घेऊन सर्वसामान्य घरातील उमेदवारांना संधी देतील. यावेळी आ. मनोज घोरपडे युवा मंच व स्वाभिमानी महिला मंचने आ. मनोज घोरपडे यांचा चांदीची गदा देऊन भव्य नागरी सत्कार केला.

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here