सातारा : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची सध्या राजकीय रणधुमाळी सुरू आहे. कारखान्याची निवडणूक २५ वर्षांनी होत आहे. तीन पॅनेलमध्ये ही लढत चुरशीने होणार आहे. कारखान्याच्या निवडणुकीत ३२ हजार २०५ सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी ९९ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. मतदान केंद्रांवर हजारवर कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. कारखान्याची निवडणूक पाच एप्रिलला होत आहे. त्याची तयारी सुरू असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक यांनी दिली.
निवडणूक अधिकारी सुद्रीक यांनी सांगितले की, पाच एप्रिलला सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होईल. कारखान्यासाठी कऱ्हाड गटात ५,११९, तळबीड गटात ५,५४३, उंब्रज गटात ६,१६५, कोपर्डे हवेली गटात ५,०६९, मसूर गटात ५,२४७, वाठार किरोली गटात ५,०६२ असे एकूण ३२,२०५ मतदार आहेत. त्या मतदारांना मतदानासाठी ९९ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदानासाठी १,०४० अधिकारी, कर्मचारी नेमले आहेत. मतदानानंतर मतपेट्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात येणार आहेत. सहा एप्रिलला तेथेच सकाळपासून मतमोजणीस प्रारंभ करण्यात येणार आहे.
साखर उद्योगाच्या बातम्या आणि संबंधित चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.