सातारा:य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्यात यावर्षी ऑफ सिजनचे नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू आहे.लवकरात लवकर हे काम सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करायचे आहे.कर्मचारी व अधिकारी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत असे मनोगत कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुरेश भोसले यांनी व्यक्त केले.अध्यक्ष डॉ. भोसले यांच्या हस्ते गळीत हंगाम २०२४- २५ साठी कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते. कृष्णा साखर कारखान्याने योग्य, नियोजनबद्ध कारभार करून सभासद, शेतकऱ्यांचे हित जोपासल्याचे मत डॉ.सुरेश भोसले यांनी व्यक्त केले.
उपाध्यक्ष जगदीश जगताप यांच्या हस्ते रोलरची पूजा करण्यात आली. यावेळी जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक लिंबाजी पाटील, निवासराव थोरात, संजय पाटील, अविनाश खरात, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, सयाजी यादव, दत्तात्रय देसाई, विलास भंडारे, वसंतराव शिंदे उपस्थित होते. कार्यकारी संचालक महावीर घोडके यांनी प्रास्ताविक केले. संचालक बाबासो शिंदे यांनी आभार मानले.