बीड : ऊसतोड मजुरांना स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड संघटनेचा पाठपुरावा व आंदोलनामुळे मोठी दरवाढ मिळाली. यानिमित्त कर्नाटक येथील सतीश शुगर ग्रुपकडून ऊसतोड कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. ऊसतोड संघटनेचे कोषाध्यक्ष गोरख रसाळ, उपाध्यक्ष संजय तिडके, सचिव सुरेश वनवे, संचालक तुकाराम तिडके, देविदास तोंडे, जयदेव तिडके यांचा सतीश शुगर उद्योग समूहाचे चेअरमन प्रदीप कुमार, एमडी कारगी, बेळगाव शुगरचे शेतकी अधिकारी बिरजे शामकुमार, सतीश शुगरचे शेतकी अधिकारी मल्लिकार्जुन ससालेटी यांनी हा सत्कार केला.
स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड संघटना भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, आ. सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना ऊसतोड मजूर, मुकादम व वाहतुकदार यांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहे. त्यांच्या शिष्टाईमुळे मजुरांना दरवाढ मिळाली. मुकादमांच्या कमिशनमध्ये १ टक्का दरवाढ करण्यात आली. या निमित्ताने सतीश शुगर ग्रुपने या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते.