कोरोना वायरसचा नवा विषाणू आणि वाढत्या केससमुळे सौदी अरेबियाने एका आठवड्यासाठी सर्व आतंरराष्ट्रीय उड्डाणांना अस्थायीपणे निलंबित केले आहे, ही अधिसूचना नागरीक उड्डाण प्राधिकरण (जीएसीए) यांच्याकडून सोमवारी जारी करण्यात आली. जगभरातील देशांनी ब्रिटेन मधून उड्डाणे आणि प्रवाशांवर प्रतिबंध लागू करण्यास सुरुवात केली आहे कारण ब्रिटेन ने सांगितलेकी, नवा कोरोना वायरस विषाणु समोर आला आहे.
जीएसीए अधिसूचनेमध्ये सांगण्यात आले आहे की, प्रवाशांसाठी सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे एका आठवड्यासाठी अस्थायी पणे निलंबित करण्यात आलें आहे, कदाचित आणखी एका आठवड्यासाठी ही मुदम वाढवली जावू शकते. सौदी मध्ये आतापर्यंत 361,000 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण समोर आले आहेत, ज्यामध्ये 6,000 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यु झाला आहे.