बिजनौर : ऊस संशोधन केंद्राकडून आलेल्या शास्त्रज्ञांनी तसेच अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी जावून ऊस पिकाची पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांना ऊसावर टॉप बोरर व इतर किडींचा फैलाव झाल्याचे आढळले. यावेळी संशोधकांनी आणि अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आपल्या पिकाची काळजी कशी घ्यावी आणि किटकनाशकाचा प्रभावी वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले.
याबाबत अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मुझफ्फनगर ऊस संशोशन केंद्रातून आलेले कीटक रोग विशेषज्ज्ञ डॉ. निलम कुरील, डॉ. अवधेश डागर यांनी बिलाई साखर कारखान्यासह अनेक कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांत पोहोचून पाहणी केली. शेतांमधील ऊस पिकाची तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना रोगग्रस्त ऊसाची रोपे दाखवून रोगाची लक्षणे आणि कारणे, त्यापासून बचावासाठी काय करावे याचे मार्गदर्शन केले. अनेक ठिकाणी पिकावर टॉप बोरर व इतक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी ऊस पिकावर नॅनो युरियाचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले. सर्व किटकनाशके आणि नॅनो युरिया ऊस समित्यांकडे अनुदानावर असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे महा व्यवस्थापक जयवीर सिंह, सहायक महाव्यवस्थापक संजीव कुमार शर्मा, सिताब सिंह, नवीन आर्य आदी उपस्थित होते.