गोहाना, हरयाणा: गोहाना चे एसडीएम आशीष वशिष्ठ यांनी सोमवारी आहुलाना गावातील चौ. देवीलाल साखर कारखान्याच्या फैक्ट्रीचे निरीक्षण केले. त्यानीं अधिकार्यांना उस गाळपामध्ये साखरेची रिकवरी वाढवण्याचे निर्देश दिले. कारखान्यामध्ये या दिवसात प्रति क्विंटल उसापासून 8.6 किलो साखर तयार होत आहे. एसडीएम यांनी अधिकार्यांना प्रति क्विंटल 10 किलो साखर तयार करण्याचे लक्ष्य दिले.
चौ. देवीलाल सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये 111 गावे येतात. या गावातील शेतकरी कारखान्यामध्ये उस घालतात. कारखान्यामध्ये उसाचे 2020-21 च्या गाळप हंगामाचा शुभारंभ 16 नोव्हेंबरला झाला होता. कारखाना प्रशासनाने जवळपास 37 लाख क्विंटल उसाचे गाळप करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कारखान्याच्या गाळप हंगामाच्या सुरुवातीला प्रति क्विंटल उसावर 7 किलो साखर तयार होत होती. साखरेची रिकवरी हळू हळू वाढत आहे. सोमवारी गोहानाचे एसडीएम आशीष वशिष्ठ कारखान्यात पोचले. त्यांनी कारखान्यामध्ये विज तयार करण्याचे यूनिट, बॉयलर, चेन यूनिटचे निरीक्षण केले. वशिष्ठ यांनी सांगितले की, सध्या गाळप हंगामामध्ये आतापर्यंत कारखान्याकडून 60 हजार यूनिट विजेचा पुरवठा विज निगमला देण्यात आले आहे. वशिष्ठ यांनी अधिकार्यांना साखरेची रिकवरी वाढवण्याचे निर्देश दिले. कारखान्यामध्ये या दिवसांत प्रति क्विंटल उसावर 8.6 किलो साखर तयार होत आहे. त्यांनी अधिकार्यांना प्रति क्विंटल 10 किलो साखर तयार करण्याचे निर्देश दिले. वशिष्ठ यांनी सांगितले की, साखरेची रिकवरी वाढवण्यामुळे कारखान्याचे उत्पन्न वाढेल. वशिष्ठ यांनी शेतकर्यांना विनंती केली की, त्यांनी कारखान्यामध्ये स्वच्छ आणि वेळेवर उस घेवून यावे. यावेळी डिप्टी चीफ इंजीनियर अनिल चौहान, उपकरण इंजीनियर एमएस पौखरिया, चीफ केमिस्ट सुरेंद्र खेवाल, सिविल इंजीनियर आरके सिंह, विवाश गुप्ता आदी उपस्थित होते