हंगाम २०२१-२२ : महाराष्ट्रात १८५ साखर कारखाने सुरू

महाराष्ट्रात साखर उत्पादनाची गती वाढली आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये १३ डिसेंबर २०२१ अखेर महाराष्ट्रात एकूण १८५ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९३ सहकारी तसेच ९२ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. एकूण ३२२.८१ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ३०२.०८ लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे. राज्यात सद्यस्थितीत सरासरी साखर उतारा ९.३६ टक्के आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक ४३ साखर कारखाने सोलापूर विभागात सुरू झाले आहेत. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार १३ डिसेंबर २०२१ अखेर सोलापूर विभागात ७८.३५ लाख टन उसाचे गाळप करून ६६.२३ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा ८.४५ टक्के आहे.

कोल्हापूर विभागात साखर उतारा १० टक्क्यांवर आहे. राज्यात सर्वाधिक साखर उत्पादनही कोल्हापूर विभागात झाले आहे. विभागात ८१.२४ लाख टन उसाचे गाळप करून ८६.६६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. साखर उतारा १०.६७ टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here