नवी दिल्ली : भारतीय साखर कारखान्यांनी २०२१-२२ या हंगामात ७२ लाख टन साखर निर्यातीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे, असे इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) म्हटले आहे. मार्च २०२२ पर्यंत प्रत्यक्षात ५६-५७ लाख टन साखर निर्यात झाली असावी असा यामध्ये अंदाज आहे.
इस्माने सांगितले की, जागतिक बाजारपेठेत चांलू हंगामात भारत ८५ लाख टन साखर निर्यात करेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.
३१ मार्च २०२२ पर्यंत ३०९.८७ लाख टन साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. तर गेल्या वर्षी ३१ मार्च २०२१ पर्यंत २७८.७१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ३१.१६ लाख टन जादा साखर उत्पादन झाले आहे.