नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार गेल्या गळीत हंगामात सहभागी झालेल्या ५०६ कारखान्यांच्या तुलनेत यंदाच्या हंगामात ५२१ कारखाने सहभागी झाले आहेत. १५ मेअखेर ४०५ कारखान्यांचा हंगाम समाप्त झाला आहे. तर देशात अद्याप ११६ कारखाने सुरू आहेत. गेल्यावर्षी २०२०-२१ मध्ये ४६१ कारखान्यांनी आपला हंगाम समाप्त केला होता आणि फक्त ४५ कारखाने सुरू होते.
इथेनॉलसाठी १४ लाख टन साखर वळवली
या वर्षी इथेनॉल उत्पादनासाठी कच्च्या साखरेचे उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत ५८.०७ लाख टन म्हणजे १८ टक्क्यांनी अधिक आहे. या वर्षी इथेनॉलमध्ये १४ लाख टनापेक्षा अधिक साखर वळविण्यात आल्याने साखर उत्पादन ४४.०६ लाख टन आहे. या महिन्याच्या अखेरीस बहुतांश कारखाने बंद होण्याची अपेक्षा आहे. मात्र, काही कारखाने जून २०२२च्या पंधरवड्यातही सुरू राहतील. याशिवाय कर्नाटक आणि तामीळनाडूमध्ये जून-जुलैमध्ये विशेष हंगाम असतो. तो सप्टेंबरपर्यंत सुरू राहतो. गेल्या वर्षी या दोन्ही राज्यांनी विशेष हंगामात सामूहिक रुपात ४.३६ लाख टन साखर उत्पादन केले होते.
८५ लाख टनाहून अधिक साखर निर्यातीचे करार
बंदरातील सूचना आणि बाजारातील माहितीनुसार, आतापर्यंत ८५ लाख टनाहून अधिक करार करण्यात आले आहेत. यामध्ये एप्रिल २०२२ च्या अखेरपर्यंत देशातून ७१ लाक टन साखर निर्यात करण्यात आली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ४३.१९ लाख टन साखरेची निर्यात झाली होती. याशिवाय मे २०२२ मध्ये जवळपास ८-१० लाख टन साखर निर्यातीची शक्यता आहे. इस्माने या हंगामात ९० लाख टन साखर निर्यातीची अपेक्षा आहे. तर गेल्या हंगामात ७१.९१ लाख टन साखर निर्यात करण्यात आली आहे.
एप्रिल २०२२ मध्ये एकूण साखर विक्री २३.९१ लाख टनावर
कारखान्यांनी दिलेली माहिती आणि इस्माने जारी केलेल्या अनुमानानुसार एप्रि २०२२ मध्ये एकूण विक्री २३.९१ लाख टन होण्याची शक्यता आहे. चालू हंगाात एप्रिल २०२२ पर्यंत एकूण विक्री १६०.०५ लाख टन होण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात याच काळात १५२.६१ लाख टन होते. म्हणजेच चालू वर्षात एप्रिल २०२२ पर्यंत विक्री सुमारे ७.५ लाख टन अथवा गेल्या वर्षी या कालावधीच्या तुलनेत ५ टक्के अधिक आहे.
यांदरम्यान, आयएमडीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की दक्षिण-पश्चिम मान्सून दक्षिण बंगालची खाडी, अंदमान निकोबार द्वीप समुह आणि अंदमान समुद्राच्या काही भागापर्यंत आला आहे. त्यानुसार दक्षिण मान्सून पुढे सरकरण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. आयएमडीने यापूर्वी या वर्षी दक्षिण मान्सून सामान्य राहील असे अनुमान वर्तवले आहे.