हंगाम २०२१-२२ : देशात १५ मार्चपर्यंत २८३.२६ लाख टन साखर उत्पादन

नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स अएसोसिएशनने (ISMA) दिलेल्या माहितीनुसार, २०२१-२२ या हंगामात देशात यंदा ५१६ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. गेल्यावर्षी ५०३ कारखाने गाळप करीत होते. यंदा १३ जादा कारखाने गाळप करीत आहेत. १५ मार्च २०२२ पर्यंत २८३.२६ लाख टन साकर उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षी समान कालावधीत, २५९.३७ लाख टन साखर उत्पादन झाले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्ंत २३.८९ लाख टन अधिक साखर उत्पादन झाले आहे. १५ मार्च पर्यंत देशात ८१ साखर कारखान्यांनी गाळप आटोपते घेतले आहे. तर ४३५ कारखाने अद्याप गाळप करीत आहेत. या तुलनेत गेल्यावर्षी १७२ कारखान्यांनी १५ मार्च २०२१ पर्यंत गाळप केले होते. ३३१ कारखाने तेव्हा गाळप करीत होते.

महाराष्ट्रात १०८.९५ लाख टन साखर उत्पादन
महाराष्ट्रात १५ मार्चपर्यंत १०८.९५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. तर गेल्यावर्षी समान कालावधीत ९४.०५ लाख टन साखर उत्पादन झाले होते. २०२१-२२ या हंगामात १३ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. बहुतांश कारखाने कोल्हापूर विभागातील आहेत. उर्वरीत १८४ कारखाने सुरू आहेत. गेल्यावर्षी या काळात ४९ कारखान्यांचे गाळप संपून १४० कारखाने सुरू राहिले होते.

७८.३३ लाख टन साखर उत्पादनासह उत्तर प्रदेश द्वितीय क्रमांकावर
उत्तर प्रदेशात १५ मार्च २०२२ पर्यंत १२० साखर कारखान्यांनी ७८.३३ लाख टन साखर उत्पादन केले आहे. १२० कारखान्यांपैकी १६ कारखान्यंचे कामकाज बंद झाले आहे. हे पूर्व उत्तर प्रदेशातील कारखाने आहेत. गेल्यावर्षी राज्यात एवढेच कारखाने सुरू होते. १५ मार्च २०२१ पर्यंत ८४.२५ लाख टन साखर उत्पादन झाले होते. गेल्यावर्षी या काळात १८ कारखान्यांचे काम बंद झाले होते.

कर्नाटकमध्ये ७२ कारखान्यांकडून ५४.६५ लाख टन साखर उत्पादन
कर्नाटकमध्ये १५ मार्चअखेर ७२ साखर कारखान्यांनी ५४.६५ लाख टन साखर उत्पादन घेतले आहे. राज्यात ७२ कारखान्यांपैकी २४ कारखाने बंद झाले आहेत. ४८ कारखाने अद्याप सुरू आहेत. गेल्यावर्षी या काळात ६६ कारखान्यांनी ४१.९५ लाख टन साखर उत्पादन घेतले होते. ६६ पैकी ६२ कारखाने बंद झाले होते. १५ मार्च २०२१ पर्यंत फक्त ४ कारखाने सुरू होते.

गुजरातसह इतर राज्यांतही चांगले साखर उत्पादन
गुजरातमध्ये १५ कारखाने सुरू आहेत. १५ मार्च २०२२ पर्यंत ९.१५ लाख टन साखर उत्पादीत झाली आहे. गेल्या वर्षी एवढेच कारखाने सुरू होते. तर २ बंद झाले होते. १५ मार्च २०२१ पर्यंत ८.४९ लाख टन साखर उत्पादन झाले होते. तामीळनाडूत २६ कारखान्यांनी २०२१-२२ या हंगामात ५.७५ लाख टन सखर उत्पादन घेतले आहे. गेल्यावर्षी २६ कारखान्यांनी ४.१६ लाख टन साखर उत्पादित झाली होती. आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, ओडिसाने १५ मार्च २०२२ पर्यंत २६.४३ लाख टन साखर उत्पादन केले आहे. आंध्र प्रदेशात २, तेलंगणामध्ये ३, बिहारमध्ये ९, पंजाबमध्ये ६, मध्य प्रदेशात ५ आणि छत्तीसगड, राजस्थान, ओडिसात प्रत्येकी १ कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे.

आतापर्यंत ६४-६५ लाख टन साखर निर्यातीचे करार
व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ६४-६५ लाख टन साखर निर्यातीचे करार झाले आहेत. फेब्रुवारी २०२२ अखेर भारताने ४७ लाख टन साखर निर्यात केली आहे. गेल्या वर्षी याच काळात १७.७५ लाख टन साखर निर्यात झाली होती. याशिवाय या महिन्याच्या अखेरपर्यंत ५५-५६ लाख टन निर्यात होईल. चालू हंगामात भारत ७५ लाख टन साखर निर्यात करेल. हा एक उच्चांक असेल. २७२ लाख टन देशांतर्गत खपाच्या तुलनेत ३३३ लाख टन उत्पादन पाहता ७५ लाख टन निर्यातीमुळे ३० सप्टेंबर २०२२ अखेर ६८ लाख टनाचा क्लोजिंग स्टॉक राहील. तीन वर्षांपूर्वीच्या १४५ लख टनाच्या स्टॉकपेक्षा हा साठा ७७ लाख टनाने कमी असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here