लखनौ : उत्तर प्रदेशातील गळीत हंगाम समाप्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आणि ऊस बिलांच्या बाबतही प्रशासन लवकारत लवकर शंभर टक्के पैसे शेतकऱ्यांना दिले जातील यासाठी प्रयत्नशील आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, १४ मे २०२२ पर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी २४,७०८.६१ कोटी रुपये म्हणजे ७३.३४ टक्के पैसे देण्यात आले आहेत. गेल्या हंगामातील शंभर टक्के ऊस बिले देण्यात आली आहेत. प्रशासनाने चालू गळीत हंगामातील ऊसाचे पैसे गतीने दिले जावेत यासाठी प्रयत्न चालवले आहेत.
उत्तर प्रदेशमधील साखर उत्पादन १०० लाख टनावर पोहोचले आहे. राज्यात गळीत हंगाम २०२१-२२ अखेरच्या टप्प्यात आला आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा कमी साखर उत्पादन झाले आहे.
१३ मे २०२२ पर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी ९९९.७५ लाख टन उसाचे गाळप करुन १०१.१४ लाख टन साखर उत्पादन केले आहे. गेल्या हंगामात राज्यात १०२७.५० लाख टन ऊस गाळप करुन ११०.५९ लाख टन साखर उत्पादन घेण्यात आले होते.
राज्य सरकारने थकीत ऊस बिले गतीने मिळावीत यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. ऊस मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी अधिकारी तसेच साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना थकबाकी देण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत.