नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) च्या म्हणण्यानुसार, सध्याच्या हंगाम २०२२-२३ मध्ये १५ जानेवारी २०२३ अखेर १५६.८ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. तर देशात गेल्या वर्षी, १५ जानेवारी २०२२ रोजी १५०.८ लाख टन साखर उत्पादन झाले होते. या हंगामात आतापर्यंत ६ लाख टन साखर उत्पादन अधिक झाले आहे. गेल्या हंगामाच्या ५०७ साखर कारखन्यांच्या तुलनेत या हंगामात ५१५ साखर कारखाने गाळप करीत आहेत.
खाली दिलेल्या तालिकेमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षाचे साखर उत्पादनाचा राज्यनिहाय तपशील देण्यात आला आहे :
ZONE | YTD JANUARY | |||
2023 | 2022 | |||
No. of operating factories | Sugar production (lac tons) | No. of operating factories | Sugar production (lac tons) | |
U.P. | 117 | 40.7 | 120 | 40.2 |
Maharashtra | 198 | 60.3 | 192 | 58.8 |
Karnataka | 73 | 33.6 | 72 | 32.7 |
Gujarat | 16 | 4.8 | 15 | 4.6 |
Tamil Nadu | 26 | 3.6 | 23 | 2.1 |
Others | 85 | 13.8 | 85 | 12.4 |
ALL INDIA | 515 | 156.8 | 507 | 150.8 |
(नोट : वरील साखर उत्पादनाची आकडेवारी साखरेला इथेनॉलमध्ये रुपांतरीत केल्यानंतरची आहे)
बंदरांमधून मिळालेली माहिती आणि बाजारातील रिपोर्टनुसार, आतापर्यंत साखरेच्या आयातीसाठी जवळपास ५५ लाख टनाचे करार करण्यात आले आहेत. त्यापैकी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत १८ लाख टनाहून अधिक साखरेची निर्यात प्रत्यक्षात देशाबाहेर करण्यात आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत समान साखरेची निर्यात करण्यात आली होती.