पुणे : महाराष्ट्रात अजूनही गाळप हंगाम सुरू असले तरी 120 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. सध्या राज्यात 106 लाख टनापेक्षा जास्त साखरेचे उत्पादन झाले आहे. महाराष्ट्रातील विभागांमध्ये किती साखरेचे उत्पादन झाले ते जाणून घेऊया.
कोल्हापूर विभाग : २७३.५३ लाख क्विंटल
पुणे विभाग : २३८.६९ लाख क्विंटल
सोलापूर विभाग : १९८.०८ लाख क्विंटल
अहमदनगर विभाग : १३३.२७ लाख क्विंटल
छत्रपती संभाजी नगर विभाग : ८५.५९ लाख क्विंटल
नांदेड विभाग : ११८.७७ लाख क्विंटल
अमरावती विभाग : ९.०७ लाख क्विंटल
नागपूर विभाग : २.२२ लाख क्विंटल
जाणून घ्या, किती आहे साखर उतारा…
कोल्हापूर विभाग : ११.५३ टक्के
पुणे विभाग: १०.४४ टक्के
सोलापूर विभाग : ९.३७ टक्के
अहमदनगर विभाग : ९.९ टक्के
छत्रपती संभाजी नगर विभाग : ८.९ टक्के
नांदेड विभाग : १०.२१ टक्के
अमरावती विभाग : ९.३४ टक्के
नागपूर विभाग : ५.८७ टक्के
महाराष्ट्रात २७ मार्च, २०२४ पर्यंत १०३७.८९ लाख टन उसाचे गाळप झाले असून १०५९.२२ लाख क्विंटल (१०५.९२ लाख टन) साखरेचे उत्पादन झाले आहे. महाराष्ट्रात चालू हंगामात मागील हंगामाच्या तुलनेत आतापर्यंत १२० साखर कारखान्यांनी गाळप थांबवले आहे, तर गेल्या हंगामात २७ मार्चपर्यंत १८८ साखर कारखान्यांनी गाळप थांबवले होते. हंगाम २०२३-२४ मध्ये २७ मार्चपर्यंत राज्याचा साखर उतारा १०.२१ टक्के आहे. तर गेल्या हंगामात समान कालावधीत साखर उतारा ९.९८ टक्के होता. कोल्हापूर विभागात २०, सोलापूर विभागात ३८, पुणे विभागात १६, अहमदनगर विभागात १३, छत्रपती संभाजी नगर विभागात १२ साखर कारखानदार, नांदेड विभागात १८ साखर कारखाने आणि अमरावती विभागात ३ साखर कारखाने बंद झाले आहेत.