नवी दिल्ली : भारतातील ऊस गळीत हंगामाला वेग आला असला तरी साखरेचे उत्पादन मागील हंगामाच्या तुलनेत अजूनही कमी आहे. इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, चालू २०२३-२४ या हंगामात १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत साखरेचे उत्पादन २२३.६८ लाख टनांवर पोहोचले, जे मागील वर्षी समान कालावधीत २२९.३७ लाख टन होते.
चालू वर्षातील साखर कारखान्यांची संख्या ५०५ असून गेल्या वर्षी सुरू असलेल्या कारखान्यांची संख्या ५०२ होती. चालू हंगामात महाराष्ट्र आणि कर्नाटकात कारखाने बंद होऊ लागले आहेत. यावर्षी या दोन राज्यात एकूण २२ कारखाने बंद झाले आहेत. तर गेल्यावर्षी समान कालावधीत २३ कारखाने बंद झाले होते.