नवी दिल्ली : यंदाच्या हंगामात आतापर्यंत देशातील एकूण साखर उत्पादनात घसरण दिसून आली आहे. मात्र, गुजरातमध्ये साखर उत्पदनात किरकोळ वाढ झाली आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्ट्रिज लिमिटेडकडील (NFCSF) आकडेवारीनुसार, ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत, गुजरातमध्ये १५ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. आतापर्यंत ४३.३३ लाख टन ऊस गाळप करून ३.९० लाख टन साखर उत्पादन घेतले आहे. दुसरीकडे गेल्या हंगामात २०२२-२३ मध्ये गुजरातमध्ये १६ साखर कारखान्यांनी ४०.८६ लाख टन ऊस गाळप करून ३.८० लाख टन साखर उत्पादन घेतले होते.
मध्य प्रदेशात १८ साखर कारखान्यांनी गाळपास सुरूवात केली असून ११.८३ लाख टन ऊस गाळप करून १ लाख टन साखर उत्पादन घेते आहे. तर गेल्यावर्षी याच कालावधीत मध्य प्रदेशमध्ये १८ साखर कारखान्यांनी १३.८६ लाख टन ऊस गाळप करून १.१५ लाख टन साखर उत्पादित केली होती. NFCSF कडील आकडेवारीनुसार, देशात ५११ साखर कारखान्यांमध्ये हंगाम २०२३-२४ साठी गाळप सुरू झाले आहे. आतापर्यंत १२२२.६४ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यापासून आतापर्यंत ११२.१० लाख टन साखर उत्पादित झाली आहे.