नवी दिल्ली : कोविड-१९च्या दुसऱ्या लाटेने देशातील आर्थिक व्यवहारांना सर्वात जास्त फटका बसला. मात्र, कृषी क्षेत्रावर याचा फारसा परिाम झाला नाही.
नीती आयोगाचे सदस्य (कृषी) रमेश चंद्र यांनी सांगितले की, कोविड १९ची दुसरी लाट भारतीय कृषी क्षेत्रावर कोणत्याही स्वरुपात परिणाम करू शकली नाही. कारण, मे महिन्यात ग्रामीण भागात संक्रमण पसरले होते. त्या काळात शेतातील कामे की होती. पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना चंद म्हणाले, अनुदान, दर आणि तंत्रज्ञानावरील भारताची धोरणे तांदूळ, गहू आणि ऊस या पिकांच्या बाजूने आहेत.
ते म्हणाले, मे महिन्यात ग्रामीण भागात कोरोनाचा अधिक फैलाव झाला. या महिन्यात शेतातील कामे खूप कमी असतात. या एक उन्हाळ्याचा महिना असतो आणि या काळात कोणत्याही पिकाची पेरणी होत नाही. काही प्रमाणात भाजीपाला आणि काही किरकोळ हंगाम नसलेली पिके वगळता कापणीचे काम नसते. चंद्र म्हणाले, शेतीची कामे मार्च अथवा एप्रिल महिन्यात भरपूर असतात. त्यानंतर त्यांचे प्रमाण खूप कमी होते. मॉन्सूनच्या आगमनानंतर शेतीची कामे पुन्हा वाढतात असे त्यांनी सांगितले.