विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडून दुसरा हप्ता खात्यावर जमा : चेअरमन, आमदार बबनराव शिंदे

सोलापूर :विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या पिंपळनेर व करकंब युनिटने प्रती टन १०० रुपयांचा दुसरा ॲडव्हान्स हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला आहे. कारखान्याने हंगामात दोन्ही युनिटकडे गाळपास आलेल्या ऊसास हंगामाच्या सुरूवातीपासून १० दिवसाला ऊस बिलाचे पेमेंट केले आहे. या ऊस बिलापोटी कारखान्याने १४ कोटी ३ लाख रूपये बँकेत जमा केले आहेत. कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ. बबनराव शिंदे यांनी ही माहिती दिली.

चेअरमन शिंदे यांनी सांगितले की, विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या पिंपळनेर युनिटने १८,९२,९४९ मे. टन ऊसाचे गाळप करून १९,२८,८५० क्विटल साखर पोती उत्पादन केले आहे. करकंब युनिटने ६,२५,८८८ मे. टन ऊसाचे गाळप करून ६,६३,९०० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन केले आहे. कारखान्याने हंगामाच्या सुरुवातीपासून १५ जानेवारीपर्यंत गळीतास आलेल्या ऊसास पहिला ॲडव्हान्स प्रती टन २७०० रुपयांप्रमाणे अदा केला. तर १६ ते ३१ जानेवारी या कालावधीत गळीतास आलेल्या ऊसास पहिला ॲडव्हान्स प्रती टन २७५० रुपये, १ ते २९ फेब्रुवारीमध्ये २८०० रुपये प्रती टन व एक मार्चपासून आलेल्या ऊसाला २८५० रुपयांप्रमाणे पहीला ॲडव्हान्स अदा करण्यात आला आहे. आता आवश्यकतेनुसार यंत्रणेचे करार लवकरच पूर्ण होत आले आहेत. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर व इतर खातेप्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here