बळीराजा कारखान्याकडून प्रती टन ३०० रुपयांचा दुसरा हप्ता जमा : चेअरमन शिवाजीराव जाधव

परभणी : कानडखेड शिवारातील बळीराजा साखर कारखान्याने ऊस बिलाचा प्रति मे. टन ३०० रुपयांप्रमाणे दुसरा हप्ता १० जूनपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. कारखान्याने गळीत हंगाम सन २०२३-२४ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा केलेला आहे, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण १८.३८ कोटी रुपये नुकतेच जमा केले आहेत, अशी माहिती बळीराजा साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी दिली.

बळीराजा कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती मे. टन २२०० रुपयांप्रमाणे पहिली उचल आधीच बँक खात्यात जमा केली आहे. गाळप हंगामात ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकऱ्यांना ऊस खरेदी करार, संमती पत्रानुसार पैसे देण्यात आले आहेत. कारखान्याची हंगाम २०२३-२४ ची अंतिम एफआरपी अंदाजे प्रती मे. टन २८०० रुपये राहील. आता दिवाळीपूर्वी तिसरा हप्ता देण्यात येईल. याची ऊस उत्पादक सभासदांनी नोंद घ्यावी असे चेअरमन जाधव यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here