संत एकनाथ कारखान्यात स्वीकृत संचालकांची निवड

छत्रपती संभाजीनगर : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत  दोन स्वीकृत संचालकांची निवड करण्यात आली. माजी नगराध्यक्ष अनिल घोडके व रवि बोडखे यांची स्वीकृत संचालक म्हणून निवड करण्यात आली. कारखाना सभागृहात झालेल्या बैठकीस व्हा. चेअरमन प्रल्हाद औटे, जेष्ठ संचालक विक्रमकाका घायाळ, संचालक तुषार शिसोदे, भाऊसाहेब पिसे, आबासाहेब मोरे, एकनाथ नवले, दत्तात्रय वाकडे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.

नुतन संचालकांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर घोडके, सुनिल घायाळ, अमोल घायाळ, दीपक चव्हाण, अमरीश घोडके, अतुल देशपांडे, अतुल मारवाडी, प्रथमेश घोडके, गोपाल गरगडे, राजेश घोडके, अलीम शेख, कृष्णा पवार, नितीन रावत, अंकुश सुडके, बापू डोईफोडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here