माळेगाव साखर कारखाना अध्यक्षपदासाठी आज निवड

माळेगाव : माळेगाव सहकारी कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी योगेश जगताप आणि केशव जगताप यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. या पदाची निवड २३ सप्टेंबर रोजी होणार आहे. अजित पवार हे सर्व संचालकांशी चर्चा करून अध्यक्षपदाचा निर्णय घेतील अशी शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपले वजन कोणाच्या पारड्यात टाकतात त्यावर अध्यक्षपदाची माळ योगेश जगताप की केशव जगताप यांच्या गळ्यात पडेल, हे स्पष्ट होईल.

योगेश जगताप यांनी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्षपदी काम केले आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या विचारांशी युवकांना जोडताना बारामती नगर परिषदेचे नगरसेवक व नगराध्यक्ष म्हणून त्यांनी कामाचा ठसा उमटविला. दुसरीकडे अध्यक्षपदासाठी सहकार क्षेत्रातील अभ्यासू चेहरा म्हणून ओळखले जाणारे सिद्धेश्वर संकुलाचे प्रमुख केशव जगताप यांचेही नाव आघाडीवर आहे. सहकारातील प्रदीर्घ अनुभव असलेल्या केशव जगताप यांनी अनेक वर्षे कारखान्याचे संचालकपद भूषविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here