लातूर : वैशालीनगर-निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना लि.मध्ये सर्व संचालक, सभासदांनी स्व. विलासराव देशमुख यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त स्मारकस्थळी पुष्पांजली अर्पण केली. यानिमित्त कारखान्याच्यावतीने विविध कायर्क्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या माध्यमातून दिवंगत विलासराव देशमुख यांना आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन रवींद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, संचालक गोविंद बोराडे, अनंत बारबोले, गुरुनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, अमर मोरे, रणजित पाटील, गोविंद डूरे, अमृत जाधव, रामदास राऊत, सुभाष माने, भारत आदमाने, संजय पाटील यांच्यासह कारखाना सभासद, शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी ठेकेदार उपस्थित होते.
रेणा कारखान्यातर्फे आरोग्य शिबिरात २५१ रुग्णांची मोफत तपासणी
दिवंगत माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त दिलीप नगर निवाडा येथील रेणा कारखानास्थळी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळा व स्मृतीसंग्रहालय स्थळी आदरांजली वाहण्यात आली. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. कारखान्यातर्फे रेणापूर ग्रामीण रुग्णालयात आयोजित शिबिरात २५१ रुग्णांची मोफत तपासणी करुन उपचार करण्यात आले. सामाजिक उपक्रम म्हणून रेणा साखर व दिशा प्रतिष्ठानतर्फे हे मोफत सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले.
लातूर ग्रामीणचे आ. धीरज देशमुख यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिबिरात २५१ रुग्णांची तपासणी करून त्यांना औषध वाटप करण्यात आले. गरजू रुग्णांवर कारखान्याच्यावतीने पुढील उपचार करण्यात येणार आहेत. रेणा कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाइस चेअरमन अनंतराव देशमुख, माजी आमदार तथा संचालक त्र्यंबकराव भिसे, यशवंतराव पाटील, ट्वेंटी वन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, प्रेमनाथ आकनगिरे, धनराज देशमुख, प्रवीण पाटील, संजय हरीदास, संग्राम माटेकर, संभाजी रेड्डी, तानाजी कांबळे, पंडित माने, स्नेहलराव देशमुख, अनिल कुटवाड आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.