हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
बरेली : चीनी मंडी
सेमीखेडा साखर कारखान्याने सोडलेले पाणी पुन्हा रेल्वे ट्रॅककडे आल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पुन्हा पाणी जर रेल्वे ट्रॅकच्या दिशेने आले तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा इज्जतनगर विभागाने दिला आहे.
सेमीखेडा साखर कारखान्यातून निघणारे दूषित पाणी सोडल्यानंतर ते लालकुआ-बरेली रेल्वे ट्रॅककडे येते. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. ट्रॅककडे पाणी येत असल्याची माहिती मिळाल्यावर इंजिनीअरिंग विभागाने तातडीने पाणी रोखण्यात यश मिळवले. लालकुआ-बरेली ही ब्रॉडगेज रेल्वेलाइन आहे. या रेल्वेमार्गाचे काम लवकर केले गेल्याने येथे पाणी आल्यावर ट्रॅक घसरण्याची शक्यता निर्माण होते. इज्जतनगर विभागाचे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र सिंह यांनी सांगितले की, ‘जर पुन्हा साखर कारखान्याचे पाणी या दिशेला आले तर कठोर कारवाई केली जाईल.’
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp