वरिष्ठ आयएएस अधिकारी निधी खरे होणार ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव

नवी दिल्ली : या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणारे रोहित कुमार सिंग यांच्या जागी वरिष्ठ आयएएस अधिकारी निधी खरे यांची सोमवारी ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. 1992 च्या बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी असलेल्या खरे सध्या भूमी संसाधन विभागाच्या सचिव आहेत.

कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, खरे यांची ग्राहक व्यवहार विभागात विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निधी खरे या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागात विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळतील. 31 मार्च रोजी रोहित कुमार सिंग हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या मंत्रालयाच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिवपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

आदेशानुसार, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार सचिव मनोज जोशी यांची भूमि संसाधन सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परिवहन आणि महामार्ग सचिव अनुराग जैन यांची गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून, अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here