कोल्हापूर : ज्येष्ठ साखर उद्योग तज्ञ, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक पी.जी. मेढे यांना व्यवस्थापन या विषयावरील संशोधन पेपरसाठी भारतीय शुगरतर्फे २०२३ चा उत्कृष्ट व्यवस्थापन संशोधन पेपर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भारतीय शुगरच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या 49वी वार्षिक सभा आणि 12व्या भारतीय साखर परिसंवाद -2024 कार्यक्रमादरम्यान मेढे यांच्यासह आठजणांना विविध श्रेणीतील पुरस्काराने मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे. विजेत्यांना तीन हजार रुपये, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
भारतीय शुगरतर्फे 2023 साठी सर्वोत्कृष्ट पेपर्ससाठी घोषित करण्यात आलेले पुरस्कार असे :
1. शेती – डॉ. प्रियांका सिंह (वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, ऊस संशोधन परिषद, शाहजहानपूर, उत्तर प्रदेश), संतोष कुंभार (युनिट हेड) आणि युवराज चव्हाण (सीडीओ, दालमिया भारत शुगर, कोकरुड, सांगली)
2. तांत्रिक– एन.ए. भुजबळ (मुख्य अभियंता, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लिमिटेड, दौंड, पुणे), डॉ. एम.बी. लोंढे (संचालक) आणि संजय गोरडे (राही टेक्नो सर्व्हिसेस, आकाशवाणी, हडपसर, पुणे)
3. व्यवस्थापन- पी. जी. मेढे (माजी एम. डी., छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना, कसबा बावडा, कोल्हापूर,), डॉ. आर.डी. कुंभार (प्राध्यापक आणि संगणक विभाग प्रमुख KBPIMSR, सातारा)