मुंबई : २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या अस्थिर सत्रात भारतीय शेअर बाजार निर्देशांक स्थिर राहिले.सेन्सेक्स १४७.७१ अंकांनी वधारून ७४,६०२.१२ वर बंद झाला, तर निफ्टी ५.८० अंकांनी घसरून २२,५४७.५५ वर बंद झाला.
एम अँड एम, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी आणि नेस्ले या निफ्टीमधील प्रमुख कंपन्यांमध्ये खरेदी पाहायला मिळाली, तर हिंडाल्को, डॉ. रेड्डीज लॅब्स, सन फार्मा, हिरो मोटोकॉर्प, ट्रेंट या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.सोमवारी सेन्सेक्स ८५६.६५ अंकांनी घसरून ७४,४५४.४१ वर बंद झाला, तर निफ्टी २४२.५५ अंकांनी घसरून २२,५५३.३५ वर बंद झाला. सोमवारच्या बंदच्या तुलनेत भारतीय रुपया ५० पैशांनी घसरून ८७.२० प्रति डॉलरवर बंद झाला.