मुंबई : भारतीय शेअर बाजार निर्देशांक ४ मार्च रोजी नकारात्मक पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स ९६.०१ अंकांनी घसरून ७२,९८९.९३ वर बंद झाला, तर निफ्टी ३६.६५ अंकांनी घसरून २२,०८२.६५ वर बंद झाला. भारत इलेक्ट्रॉनिक्स, एसबीआय, बीपीसीएल, श्रीराम फायनान्स, अदानी एंटरप्रायझेसमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले तर बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प, बजाज फिनसर्व्ह, नेस्ले आणि आयशर मोटर्समध्ये गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा पाहायला मिळाला.
सोमवारच्या सत्रात सेन्सेक्स ११२.१६ अंकांनी घसरून ७३,०८५.९४ वर तर निफ्टी ५.४० अंकांनी घसरून २२,११९.३० वर बंद झाला होता. सोमवारच्या ८७.३६ च्या तुलनेत मंगळवारी भारतीय रुपया ९ पैशांनी वधारून ८७.२७ प्रति डॉलरवर बंद झाला.अमेरिकेतील मंदावलेली आर्थिक वाढ आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या नवीन करांचा मंगळवारी भारतीय शेअर बाजारांमध्ये परिणाम पाहायला मिळाला.