मुंबई :शेअर बाजारात 17 ऑक्टोबर रोजी सलग तिसऱ्या सत्रात दबाव पाहायला मिळाला. बेंचमार्क निफ्टी 221.50 अंकांनी घसरून 24,750 च्या खाली बंद झाला. माहिती तंत्रज्ञान वगळता सर्व क्षेत्रांमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला.बंद होताना सेन्सेक्स 494.75 अंकांनी किंवा 0.61 टक्क्यांनी घसरून 81,006.61 वर आणि निफ्टी 221.50 अंकांनी किंवा 0.89 टक्क्यांनी घसरून 24,749.80 वर होता.
बजाज ऑटो, श्रीराम फायनान्स, हिरो मोटोकॉर्प, नेस्ले आणि एमअँडएम हे सर्वाधिक घसरले तर टेक महिंद्रा, इन्फोसिस, एलअँडटी, पॉवर ग्रिड कॉर्प आणि एसबीआयचे शेअर वधारले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक प्रत्येकी 1 टक्क्यांहून अधिक घसरले. BSE वर 240 हून अधिक समभागांनी त्यांच्या 52 आठवड्याचा उच्चांक गाठला. ज्यात स्ट्राइड्स फार्मा, टेक महिंद्रा, गुजरात फ्लुरो, CAMS, IFB इंडस्ट्रीज, इंडिगो पेंट्स, फर्स्टसोर्स सोल्युशन्स, कारट्रेड टेक, ICRA, धनी सर्व्हिसेस, ओबेरॉय रियल्टी यांचा समावेश आहे.