मुंबई : भारतीय बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 26 डिसेंबर रोजी सपाट बंद झाले. सेन्सेक्स किरकोळ 0.39 अंकांनी घसरून 78,472.48 वर बंद झाला, तर निफ्टी 22.55 अंकांनी वाढून 23,750.20 वर बंद झाला. विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा कायम राहिल्याने प्रारंभिक सत्रात सेन्सेक्स-निफ्टीने घेतलेली उसळी फार काळ टिकली नाही. सेन्सेक्समधील १४ समभाग वधारले, तर १६ मध्ये घसरण झाली. निफ्टीत २२ समभाग वधारले तर २८ समभागात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.
निफ्टीमध्ये अदानी पोर्ट्स, श्रीराम फायनान्स, एम अँड एम, मारुती सुझुकी, एसबीआय लाइफ इन्शुरन्स हे प्रमुख शेअर वधारले, तर टायटन, एशियन पेंट्स, नेस्ले, जेएसडब्ल्यू स्टील, ग्रासिम इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण मात्र सुरुच आहे. मंगळवारच्या 85.20 बंदच्या तुलनेत भारतीय रुपया गुरुवारी प्रति डॉलर 85.26 या नवीन विक्रमी नीचांकी पातळीवर बंद झाला.