खाद्य मंत्रालयाकडून ऑगस्टसाठी १९ लाख टन साखर विक्रीला मंजूरी दिली गेली होती. पण या वेळी गेल्या महिन्याच्या तुलनेत अधिक साखरेचे वाटप झाले आहे. सप्टेंबरचा १९.५ लाख टन साखरेचा कोटा बाजारात गोडवा निर्माण करेल.
सध्या सणा सुदीचे दिवस सुरु आहेत, यामुळे घरगुती साखरेच्या मागणीत चांगली वाढ होत आहे. याचा परिणाम साखर उद्योगावर नक्कीच होईल. सणासुदीचे दिवस लक्षात घेता साखरेच्या किमतींवर देखील याचा सकारात्मक परिणाम होईल. बऱ्याच काळापासून अडचणींशी सामना कराव्या लागणाऱ्या साखर उद्योगाला या महिन्यात थोडा दिलासा मिळेल.
देशात साखरेचे अतिरिक्त साठे पडून आहेत. यापासून साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी ६० लाख टन साखरेच्या निर्यातीची घोषणाही नुकतीच करण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयामुळे साखरेचा अधिशेष कमी होईल. देशभरात कारखाने आपली साखर विकली जावी यासाठी भरपूर प्रयत्न करत आहेत, तसेच आपली अर्थिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने त्यांचे संपूर्ण लक्ष गणेश चतुर्थी, नवरात्री, दसरा आणि दिवाळी या येणाऱ्या सणांकडे लागून राहिले आहे. यामुळे साखर कारखाने मागणी आणि पुरवठ्यासाठी सक्षम राहतील.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.